Holi : केमिकलच्या रंगापासून वाचवतील या टिप्स

Created By: Atul Kamble

3 March 2026

 रंगपंचमीला रंगायला आणि रंगवायला सर्वांनाच आवडते.परंतू केमिकलचे रंग त्वचेला आणि केसांना नुकसान पोहचवू शकतात.

होळीला स्कीन आणि केसांच्या सेफ्टीसाठी इंस्टा पेजवर amrutamofficial काही आयुर्वेदिक हॅक्स सांगितले आहेत.

 होळी खेळण्याच्या आधी चेहरा आणि हातांना चंदनात एलोव्हेरा जेल मिक्स करुन लावावे, यामुळे त्वचेवर एक पोटेक्शन लेअर तयार होते. ज्यामुळे रंगापासून संरक्षण मिळते.

 केसांना रंगापासून वाचवण्यासाठी हेअर ऑईलने मसाज करावे. त्यामुळे केसांवर एक शील्ड तयार होते. त्यानंतर रंग सहज निघतो.

 होळीची सुरुवात एक ग्लास केसर-हळदीचे दूध वा  ठंडाईने करा. याने इम्युनिटी वाढते.शरीराला थंडावा मिळतो. केमिकल रंगाचा असर कमी असतो.

 होळीचे रंग नखांना लागले तर  लवकर निघत नाहीत. यासाठी ट्रान्सपरन्ट नेल पॉलिश लावावे,आणि नखांच्या आसपास थोडे तेल लावावे

 अनेकजण रंग खेळताना ओठांची काळजी घ्यायला विसरतात.ओठांना देशी तूप किंवा एलोवेरा जेल लावावे.याने ओठ सॉफ्ट आणि मॉइश्चराईज्ड आणि डागांपासून सुरक्षित राहतील.

रंग खेळून झाल्यानंतर साबणा ऐवजी काकडीचा रस वा कच्चे दूध कॉटनने लावून त्वचा स्वच्छ करावी.यामुळे हळूहळू रंग निघतो आणि त्वचा ड्राय होत नाही.

 रंगपंचमी खेळताना अधून मधून चेहऱ्यावर गुलाब जल स्प्रे करावा,त्याने स्कीन हायड्रेट रहाते.जळजळ कमी होते आणि केमिकल रंगानी होणारे इरिटेशन टळते.

 रंग खेळल्यानंतर अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने उकळून मिक्स करावी.यामुळे स्कीन इन्फेक्शन होत नाही. आणि स्कीन फ्रेश रहाते.