अतिशय भोळ्या व्यक्तींनी या जगात जगावे कसे?

21 November 2023

Created By: Mahesh Pawar

26 November 2023

Created By: Mahesh Pawar

भावनिकदृष्ट्या आपण ज्याला साधाभोळा, व्यावहारिक जगात त्याला बावळट समजले जाते.

जग त्याच्या भोळेपणाचा फायदा घेत राहते, असा माणूस कायम त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहतो.

तरीही भोळ्या माणसाला करण्यासारख्या काही गोष्टी तरी नक्कीच आहेत.

कोणावरही संपूर्ण, कायमस्वरूपी विश्वास ठेऊ नये. कोणत्याही गोष्टीची स्वतः खात्री करावी.

कोणताही कागद वाचल्याशिवाय, नीट समजून घेतल्याशिवाय त्यावर संमतीदर्शक सही करू नये.

कोणालाही उधार पैसे देऊ नये आणि शक्यतो उधार पैसे घेऊही नयेत.

मनात एखादी शंका आल्यास ती स्पष्ट शब्दात व्यक्त करावी. लोकं हसतील याची चिंता करू नये.

चारचौघांपेक्षा आपले विचार वेगळे असल्यास ते व्यक्त करावेत. आपण दर वेळी चूकच आहोत असा विचार करू नये. 

जर चूक झालीच तर 'सर्वजणच चुका करतात' याची जाणीव ठेवावी आणि मस्तीत जगावे.

एखाद्या व्यक्तीला प्रपोज करण्याआधी तुम्ही खरंच तिच्या प्रेमात आहात का? हे स्वतःला विचारा.