समोरील व्यक्तीच्या बोलण्यावरून त्याच्या मनातील भाव कसे ओळखाल?

20 November 2023

Created By: Mahesh Pawar

ही एक कला आहे. याचा अभ्यास वगैरे नसतो पण चातुर्य असते.

समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावरून मनातील भाव ओळखणे याला मनकवडा असे म्हणतात.

सगळ्यांनाच ही कला अवगत नसते हे मात्र खरे.

शब्द बोलताना जोश आणि गर्वाची भाषा असेल तर तो स्वतःला शहाणा समजतो.

शब्दांत मवाळपणा, काळजी, उपदेश असेल तर निस्वार्थीपणाचा भाव आणि प्रामाणिक व्यवहार असतो.

तुमचा किती फायदा करुन देणार असे शब्द वारंवार बोलणे म्हणजे स्वार्थीपणा, धूर्त, कपटी भाव.

स्वतःला कोणत्याही कामासाठी श्रेय न देता नशीब आणि देव यांचा उल्लेख म्हणजे भोळसटपणा आणि भोळा भाव असतो

नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो. 

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा