एक्सरसाईज न करता पोट कसे कमी कराल ?

27 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

जर तुमच्याकडे एक्सरसाईज करायला वेळ नसेल तरी तुम्ही लाईफस्टाईल चेंज करुन वजन कमी करु शकता.

एक्सरसाईज न करता ही वजन कसे कमी करायचे हे आपण पाहूयात

वजन वाढण्यास सर्वाधिक आपला आहार जबाबदार असतो. त्यामुळे डाएटमध्ये बदल करणे महत्वाचे असते.

डाएटमध्ये जास्त कॅलरीचे, तेलकट, गोड आणि पॅकबंद अन्न बाद करावे

 आहारात अर्धा भाग भाज्यांचा समावेश करावा.

शुगर किंवा रिफाईंड कार्ब्स सारखे साखर, मैदा, सफेद ब्रेड आणि बिस्कीटाचे सेवन कमी करावे. या वस्तू वेगाने वजन वाढवतात.

रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, त्याने मेटाबॉलिझम वाढते.त्यामुळे वजन नियंत्रित होते.

दर रोज ७ ते ८ तास झोपावे. कारण कमी झोपेने वजन वाढणारे हार्मोन्स सक्रीय होतात. 

जरी तुम्ही एक्सरसाईज करत नसाल तरी चालणे किंवा सायकलिंग करुन वजन नियंत्रित करु शकता