घरात मनी प्लांट असणं शुभ देखील मानलं जातं.

मनी प्लांट लावण्यासाठी मातीची गरज भासत नाही. 

काचेच्या बाटलीमध्ये पाण्यात देखील मनी प्लांटची वाढ होते.

फक्त 2 इंच मनी प्लांट वाढतं किंवा पाणी बदलून देखील झाड वाढत नाही. 

तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर काहीतरी चूकत आहे. 

मनी प्लांट तुम्ही घरात ठेऊ शकता. पण त्याला खेळत्या हवेत ठेवा... 

मनी प्लांटच्या बाटलीतील पाणी आठवड्याने बदला.

बाजारात  मनी प्लांटचं फर्टीलायजर मिळतं. याचा उपयोग तुम्ही  1 - 2 वेळा करु शकता. 

सूर्याच्या किरणांपासून  मनी प्लांट लांब ठेवा, नाही तर पानं खराब होतील.