Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

केमिकल्सने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे ?या पाहा ट्रीक्स  

Created By: अतुल कांबळे

आंब्याला फळांचा राजा म्हणतात,तो मधुर असतोच शिवाय आरोग्यासाठीही चांगला असतो. 

दशहरी,केसर,लंगडा, अल्फान्सो सर्वांना आवडतात

 आंब्यात पोटॅशियम, फोलेट, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी, ई, बी-६ आणि व्हिटॅमिन के सारखे अनेक पोषक घटक असतात.

आंब्यात  व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. पण आंबा मर्यादित प्रमाणातच खावा.

रसायनाने पिकवलेले आंबे अधिक पिवळे आणि चमकदार असतात; त्यावर हिरवे डाग देखील असू शकतात. नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे हलक्या पिवळ्या रंगाचे असतात

रसायनांनी पिकवलेल्या आंब्यांना विचित्र वास येतो, तर नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांना खूप तीव्र आणि नैसर्गिक सुगंध येतो

आंब्याची एक बाजू मऊ असेल आणि दुसरी बाजू कडक असेल तर ते रसायने वापरून पिकवलेले असू  शकतात. तर नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा सर्वबाजूंनी पिकलेला असतो

एका भांड्यात आंबा बुडवा, जर आंबा तरंगला तर तो रसायनांनी पिकलेला असू शकतो. तर नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा पाण्यात बुडेल. जर हिरव्या आंब्यावर पांढरी पावडर दिसली तर तो रसायनांनी पिकवलेला असू शकतो.