एक्सरसाईज न करता वजन कसे कमी करायचे ?

31 ऑगस्ट 2026

Created By:  atul kamble

जर तुमच्याकडे व्यायामासाठी वेळ नसेल तरी स्मार्ट लाईफस्टाईल स्वीकारुन वजन कमी करता येते.

चला तर जाणून घेऊयात विना एक्सरसाईज वजन कमी कसे करायचे ?

वजन वाढण्यास सर्वात कारणीभूत बिघडलेले खानपान म्हटले जाते.

तुमच्या आहारातून जास्त कॅलरीचे फूड, तळलेले, गोड आणि पॅकबंद पदार्थ बाहेर काढा.

प्लेटचा अर्धा भाग भाज्यांसाठी ठेवा,पांढऱ्या भात खाण्याऐवजी ब्राऊन भात खा.

शुगर, रिफाईंड कार्ब्स उदा.पांढरा ब्रेड आणि बिस्कीटाचे सेवन कमी करा. हे पदार्थ वेगाने वजन वाढवतात.

दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने शरीराचे मेटा बॉलीझ्म वाढते. जे वजन नियंत्रणास मदत करते.

कमी झोपल्याने वजन वाढवणारे हार्मोन्स एक्टीव्ह होतात, यामुळे रोज किमान ७ ते ८ तास झोप घ्या आणि तणाव टाळा

जर तुम्ही एक्सरसाईज करत नसाल तर रोज छोटे-छोटे मुव्हमेंट, चालणे, सायकलिंग केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.