20 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
यु्रिक ॲसिड शरीरातील टाकाऊ पदार्थ असतो. किडनी नीट काम करत नसेल तर युरिक ॲसिड सांध्यात जमते. त्याने आपल्या तीव्र वेदना होतात
शरीरात युरिक ॲसिड वाढल्यास संधीवाताचा त्रास सुरु होतो. त्यामुळे युरिक ॲसिड कंट्रोल करणे गरजेचे असते.
युरिक ॲसिड वाढेल असे पदार्थ आहारातून बाद करणे हाच एक उपाय आहे.
युरिक ॲसिडवर नियंत्रण मिळवायचे असेल तर रेड मीट आणि ऑर्गन मीटचे सेवन करु नये. यात प्युरिनचे प्रमाण जास्त असते. प्युरिन युरिक ॲसिड वाढवू शकते.
सी फूडची आवड असली तरी सार्डिन, मॅकरेल, ऐन्कोवीज आणि प्रॉन्स सारखे सी फूड खाऊ नयेत.
अल्कोहोल आरोग्यासाठी वाईट असते. युरिक ॲसिड जास्त असेल तर मद्यापासून दूर राहा.
युरिक ॲसिडला नियंत्रित करायचे असेल तर चेरी, स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि लिंब वर्गीय फळांचे सेवन करावे.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )