1 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
किडनी शरीरात रक्त शुद्धीकरणाचं काम करते. रक्तातील विषारी पदार्थ, जास्तीचं पाणी आणि मीठ काढून टाकते. पण काही सवयी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात.
डॉ. सुभाष गिरी यांच्या मते जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील रक्तदाब वाढतो. यामुळे मूत्रपिंडाचं नुकसान होऊ शकतं.
पुरेसं पाणी न प्यायल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. किडनी ते गाळू शकत नाही. त्यानेतर मूत्राशयात खडे तयार होऊन संसर्ग होऊ शकतो.
चिप्स, नमकीन, लाल मास आणि जास्त प्रथिने असलेले पदार्थ किडनीवर परिणाम करतात. शरीरात यूरिक एसिड वाढवतात. यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ वेदनाशामक औषधं घेतल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो. किडनीतील रक्तपुरवठा कमी होतो.
जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो. यामुळे किडनी हळूहळू कमकुवत होऊ शकते.
किडनीच्या समस्या टाळण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि निरोगी आहार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका.