डार्क सर्कल्स घालवण्यासाठी खावेत हे पदार्थ (Photos : Freepik)
डार्क सर्कल्सचा त्रास बऱ्याच जणांना होतो. जागरण, स्क्रीनचा अतीवापर, ताण यामुळे ही समस्या होऊ शकते.
डार्क सर्कल्समुळे लूकवरही परिणाम होतो. ही समस्या कमी करण्यासाठी काही पदार्थ खाणे उपयुक्त ठरते.
टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन डोळ्यांसाठी उत्तम असते. भाजी, सूप, सलाड स्वरूपात याचे सेवन करू शकता.
डाळिंबामध्ये लोहासारखी पोषक तत्वं असतातं. त्याने स्किन हायड्रेट होते आणि डार्क सर्कलही कमी होतात.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी एजिंग गुणधर्म असतात. ते डोळ्यांसाठीही फायदेशीर असते.
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्याच्या सेवनाने डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक असते. त्यातील ब्लीचिंग एजंटमुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत मिळते.
बीटामध्ये मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन सी अधिक असते. ते डार्क सर्कल्स दूर करण्यास मदत करते.
नवरात्रीसाठी नुसरत भरूचाचा हा लुक आहे बेस्ट, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा