पोटात गॅस किंवा दुखत असेल तर एक ग्लास कोमट पाण्यात एक चिमुटभर हिंग मिसळून प्या,यातील एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात.त्यामुळे पोटातील मुरडा आणि जडपणा दूर होतो.
डायजेशन खराब झाल्यानंतर कोमट पाण्यात जिरे पावडर आणि थोडेसे काळे मीठ टाकून प्यावे,एसिडीटी कमी होते आणि पचन तेज होते.
आल्यातील जिंजरोल पचन यंत्रणेला एक्टीव्ह करते. पोट खराब झाल्यास आल्याचा तुकडा चावा किंवा आल्याचे पाणी प्या..
पोटातील उष्णता, एसिडीटी आणि ब्लोटिंग शांत करण्यासाठी एक चमचा बडी सौफ टाकून ग्लासभर पाणी उकळा, किंवा रात्रभर बडीसौफ भिजवलेले पाणी प्या..
दुपारी जेवल्यानंतर एक ग्लास ताकात भाजलेला ओवा आणि जिरे पावडर मिसळून प्या, ताकातील गुड बॅक्टेरिया वा प्रोबायोटिक्स आतड्यांना आरोग्यदायी ठेवतात.
जर सकाळी पोट नीट साफ होत नाही, बद्धकोष्ठता असेल तर रात्री कोमट पाण्यात अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण टाकून प्या, त्याने पोट साफ होईल.