सकाळी पोट नीट साफ होत नाही, तर हे उपाय आजमवा 

16 DEC 2025

अनेक लोक सकाळी पोट साफ होत नसल्याने त्रस्त असतात.संपूर्ण दिवस त्यांना उत्साही वाटत नाही अन् बैचेनी सतावते.

 ही समस्या नेहमी अनियमित दिनचर्या, कमी फायबरचा आहार घेणे, पाणी कमी पिण्याने होते. यासाठीचे सोपे पाहूयात...

सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यावे, त्यामुळे आतड्यांची गती उत्तेजित होते. मल त्यागण्यास सोपे जाते.या पाण्यात लिंबूचा रस देखील टाकू शकता.

फायबर युक्त आहार वाढवा, मिलेट्स, फळे (पपई,सफरचंद ) आणि हिरव्या पालेभाज्या बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.

 रोज ३० मिनिटे हलका व्यायाम, उदा. फिरणे किंवा योगासने करणे. यामुळे पचन प्रक्रीया चांगली होते. पोट योग्यवेळी साफ होते. 

रोज दिवसाच्या ठराविक वेळी शौचाला जाण्याची सवय शरीराला लावा. ही शरीराच्या अंतर्गत घड्याळाला नियंत्रित करण्यास मदत करते.