आर्य चाणक्य यांना कौटिल्य म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित समस्यांचा उल्लेख केला आहे.

21 June 2025

चाणक्य यांचे नीतिशास्त्र जीवन आनंदी, यशस्वी आणि समृद्ध करण्यासाठी उपयोगी आहे.

आर्य चाणक्य यांच्यानुसार, जीवनात यश मिळवण्यासाठी मनातील गोष्टी कोणासोबत शेअर करु नये. 

पैशाच्या अपव्यय, मनात असलेली दुःख देणारी गोष्टी किंवा एखाद्या व्यक्तीच्या वाईट सवयींशी संबंधित गोष्टी कोणालाही सांगू नयेत.

चाणक्य म्हणतात, असे केल्याने कोणीतरी दुसरा किंवा तिसरा व्यक्ती तुमचा थेट फायदा घेऊ शकतो.

चाणक्य म्हणतात, तुमचा कुठे अवमान झाला तर ते सुद्धा कोणाला सांगू नये. 

तुमचा अपमान झाल्याचे कोणाला न सांगणेच योग्य आहे. अन्यथा लोक तुमची मस्करी करतात.