दिवाळीत खायची आहे भरपूर मिठाई ? असे करा Body Detox

11 November 2023

Created By : Manasi Mande

दिवाळी म्हणजे रांगोळी, आकाशकंदील, नवे कपडे आणि भरपूर मिठाई..

दिवाळीत फराळ, मिठाई, गोड पदार्थ खाण्याचे क्रेव्हिंग कोणीच रोखू शकत नाही. 

तुम्हालाही दिवाळीत पोटभर आणि मन भरेपर्यंत फराळ खायचा असेल तर बॉडी डिटॉक्सचे उपाय जाणून घ्या. 

फिट राहण्यासाठी व्यायामासह चांगले डाएट आणि नियमित डिटॉक्स करणंही गरजेचं आहे.  

माइंडफुल इटिंग करा. शरीराला कशाची गरज आहे त्यानुसार खाण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही फळं आणि सलाडही खाऊ शकता. त्यानेही शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर पडतील.

सणासुदीच्या काळात साध्या चहा-कॉफीपेक्षा हर्बल किंवा ग्रीन टी प्या. याने पचनाला मदत मिळते.

सणाच्या काळात डेली वर्कआऊट कधीच बंद करू नका. जास्त दमला असाल तर योग आणि हलका व्यायाम करू शकता.

चांगल्या आरोग्यासाठी शांत झोपही तितकीच महत्वाची आहे. हा डिटॉक्स करण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे. 

सकाळी उठल्यावर ‘या’ चुका बिलकूल करू नका