स्नॅक्समध्ये खा भाजलेले चणे.. मिळतील जबरदस्त फायदे

6 February 2024

Created By : Manasi Mande

संध्याकाळच्या वेळी कडकडून भूक लागते, तेव्हा आपण स्नॅक्स म्हणून जंक फूड खातो. पण त्याने शरीराचे नुकसान होते. अशावेळी हेल्दी ऑप्शन निवडावा.

भाजलेले चणे हा स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे. त्याचे असंख्य फायदेही मिळतात.

भाजलेल्या चण्यांमधून प्रोटीन भरपूर मिळतात आणि पोटही भरलेलं राहतं. त्याने स्नायूही मजबूत होतात.

चण्यात फायबर असतात, ज्यामुळे पचन सुधारते. हे खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही, वजनही नियंत्रणात राहते.

भाजलेल्या चण्यांमध्ये फॅट कमी असतात, त्यामुळे फॅट्सपासून बचाव होतो.

भाजलेल्या चण्यांमध्ये जटील कार्बोहायड्रेट्स असतात, जे हळूहळू तुटतात. त्यामुळे हळूहळू आणि बराच काळ एनर्जी मिळते.

चण्यांमध्ये फॉलेट, लोह, फॉस्फरस आणि मँगनीज भरपूर असते. तसेच त्यात व्हिटामिन्स आणि मिनरल्सही मुबलक असतात.

चण्यात कमी फायबर आणि कमी फॅट्स असतात, जे हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही.

भाजलेल्या चण्यांमध्ये जटील कार्बोहायड्रेट्स असतात, त्यामुळे ब्लड शुगर पटकन वाढत नाही.