धकधक गर्लच्या पतीने उन्हाळ्यासाठी दिल्या खास स्किन केअर टिप्स, श्रीराम नेने म्हणाले...
11 March 2025
Created By : Manasi Mande
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने इन्स्टावर सक्रिय असतात आणि आरोग्य विषयक सल्ला नेहमी शेअर करतात.
उन्हाळा आता तोंडावर आला असून अशावेळी त्वचा चांगली ठेवण्यासाठी काय करावं हे त्यांनी सांगितलं.
डिहायड्रेशन होऊ नये, चमकदार त्वचा मिळावी यासाठी काही खास टिप्स डॉ. नेने यांनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केल्या.
हायड्रेशन महत्वाचं... उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या आणि चहा, कॉफीचा अतिरेक टाळा.
त्वचेसाठी जेल बेस क्लिंझर वापरा. दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवा. त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.
उन्हाळ्यात फक्त घराबाहेर पडतानाच नव्हे तर घरातही सनस्क्रीन नक्की वापरा.
उन्हाळ्यासाठी मॉईश्चरायझर हे देखील जेल बेस असलेले वापरा. यामुळे त्वचा खूप चिपचिपित होणार नाही आणि हायड्रेटेड राहण्यासही मदत होते.
Clean face is happy face...रात्री झोपण्यापूर्वीही चेहरा स्वच्छ धुवा, हे कधीच विसरू नका.
हीच योग्य मेथड… धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने असं काय सांगितलं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा