हीच योग्य मेथड... धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने असं काय सांगितलं?

 4 March 2025

Created By : Manasi Mande

हल्ली वजन कमी करण्यासाठी इंटरमिंटेट फास्टिंग केलं जातं, त्याच्या दोन पद्धती आहेत

यात रोज 16 तास उपवास करून 8 तासा दरम्यान जेवण करावं लागतं

दुसरी पद्धत म्हणजे 5:2 डाएट. यात तुम्ही आठवड्यातून पाच दिवस जेवता आणि दोन दिवस उपवास करता

यावर अभिनेत्री माधुरी दीक्षितचा नवरा डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांचं मत मांडलंय

तुम्ही काय खाता हे इंटरमिंटेट फास्टिंग नाही, तर तुम्ही कधी खाता हे इंटरमिंटेट फास्टिंग आहे

ठरावीक काळासाठी फास्टिंग केल्यावर मेटाबॉलिज्म चांगलं होतं, असं डॉ. नेने म्हणतात

चांगल्या मेटबॉलिज्मने शरीरातील साखर कमी होते, त्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते

चुकीच्या फास्टिंगने शरीरावर परिणाम होतो, यावेळी जंक फूड खाल्ल्यास प्रोटिन मिळणार नाही

शिवाय फास्टिंग काळात वेळी अवेळी जेवल्यावरही शरीराला नुकसान होतं

अत्याधिक उपवासाने रुग्णांचे हार्मोनल असंतुलित होतात, तणाव वाढतो, असं नेने म्हणतात