मनुका म्हणजेच बेदाणा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात अनेक पोषक तत्व असतात.

20 May 2025

Created By : जितेंद्र झंवर

मनुकामध्ये लोह, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. 

मनुका कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, आहारातील फायबर इत्यादी अनेक पोषक तत्वांचा स्रोत आहे.

मनुके पाण्यात भिजवून खाणे अधिक फायदेशीर असते. उन्हाळ्यात मनुके भिजवून सेवन केल्यास त्याचा गरम प्रभाव कमी होतो. 

नियमित 30 ते 50 ग्रॅम मनुके खाल्ले पाहिजे. पाण्यात भिजवून मनुके खाल्यास त्याचा फायदा एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. 

एनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता असलेल्या रुग्णांसाठी असे मनुके लाभदायक आहेत. या लोकांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुके खावेत. 

मनुके हे लोहाचे स्रोत आहेत. त्यामुळे रक्त पेशी तयार करण्यास मदत करतात. इंस्टेंट एनर्जी बूस्ट म्हणून मनुके कार्य करतात. 

पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खावेत. तसेच या लोकांनी मनुकाचे पाणी पिणे देखील फायदेशीर आहे.

ब्लड शुगर म्हणजे मधुमेह असेल तर मनुके खाणे टाळावे. विशेषतः रिकाम्या पोटी मनुके खाऊ नका, अन्यथा साखरेचे प्रमाण वाढू शकते.