व्यायामानंतर लगेच पाणी प्यावं की नाही? जाणून घ्या

28   जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

व्यायाम तंदुरुस्त राहण्यासाठीच नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे. 

दररोज व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे चांगली झोप येते. तसेच पचनप्रक्रिया सुधारते. वजन देखील नियंत्रणात राहते. 

व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिता येतं का? डॉक्टरांच्या मते, तुम्ही थंड पाणी पिऊ शकत नाहीत. व्यायाम केल्यानंतर 10 मिनिटे सामान्य किंवा कोमट पाणी पिऊ शकता.

कोमट पाणी प्यायल्यानंतर शरीर हळूहळू थंड होते आणि रक्तप्रवाह सामान्य होतो.

थंड पाण्यामुळे स्नायूंना धक्का बसू शकतो. तसेच पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो. थकवा वाढू शकतो. 

व्यायामानंतर 250 ते 500 मिली पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी पिण्याचं नियोजित करू शकता. 

तुम्हाला खूपच घाम येत असेल तर नारळ पाणी किंवा ओआरएससारखं इलेक्ट्रोलाइटयुक्त पाणी पिऊ शकता. यामुळे खनिजे आणि मिठाची उणीव भरून निघेल.  

उन्हात राहिल्यानंतरही व्हिटॅमिन डी वाढत नाही का? असं का ते समजून घ्या