Created By: Atul Kamble

पायात दिसली ही लक्षणे तर असू शकतात या आजाराचे गंभीर संकेत...

Created By: Atul Kamble

28 May 2026

लिव्हर एक महत्वाचा अवयव आहे. ते केवळ टॉक्सिन बाहेर काढत नाही तर डायजेशन, हार्मोन बॅलन्स आणि इम्युनिटीत महत्वाचे असते.

 लिव्हर जेव्हा नीट काम करत नाही तेव्हा शरीरात फ्लूईड रिटेंशन होऊ लागते.ज्यामुळे पाय, टाचा आणि पंजात सूज येते

लिव्हरच्या आजारात पित्ताचा फ्लो प्रभावित होतो.ज्यामुळे शरीरात बाईल साल्ट्स जमा होते. यामुळे त्वचेला खाज सुटते

लिव्हर डॅमेज झाल्याने टॉक्सिन्स शरीरात जमा होतात.त्यामुळे पायात जडपणा, सुन्नपणा वा वेदना होऊ शकतात.

 लिव्हर सिरोसिसच्या स्थितीत हार्मोनल असंतुलन होते,ज्यामुळे पायात निळ्या नसा उठावदारपणे दिसतात.

 जेव्हा लिव्हर नीटपणे बिलीरुबिन प्रोसेस करत नाही, तेव्हा शरीरात याची पातळी वाढते, यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे दिसतात

 लिव्हर संबंधित गंभीर आजारात शरीरातील स्नायू आकुंचन पावतात,त्यामुळे पायात कमजोरी, थकवा जाणवतो.

लिव्हर नीट काम करत नसल्यास ब्लड सर्क्युलेशन प्रभावित होते. ज्यामुळे पायांचा रंग निळा, जांभळा लालसर होऊ शकतो.

लिव्हर खराब झाल्याने नव्हर्स सिस्टी प्रभावित होते.यामुळे पायात झिणझिण्या वा सुन्नपणा येतो.