असा जपा नात्यांमधला जमाखर्च, नातेवाईक यांनाही वाटेल हेवा   

18 November 2023

Created By: Mahesh Pawar

नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो. 

नात्यांमध्ये मी इतके कॉल आणि मेसेज केले पण समोरच्याने एकही नाही केला, असा ही हिशोब मांडला जातो.

सकाळची सुरुवात कोण ‘गुड मॉर्निंग’चा मेसेज पहिला करतो याची वाट बघितली जाते. क्षुल्लक गोष्टींची नोंद ठेवली जाते.

खात्यात रक्कमच नसेल तर मशिनमधून पैसे कसे येतील? म्हणून आपणही आपल्या नाते संबंधाचा जमाखर्च मांडला पाहिजे.

सत्कृत्याची शिल्लक नसेल तर अडचणीच्या, दुःखाच्या वेळी आपल्या सोबत कुणीच नसेल. 

आपल्या चुकांमुळे, अहंकारामुळे, स्वार्थामुळे, द्वेषबुद्धीने किंवा संपर्कात न राहिल्यामुळे दुरावलेली नाती खर्चात मोडतील. 

हा जमाखर्च आयुष्यभर चालू राहतो. नाती बळकट करण्यासाठी नात्याचाही जमाखर्च पाहायलाच हवा.

नात्यांमध्ये जमा करायचं असेल तर जो शब्द आपण इतरांना देतो त्याचे पालन करणे महत्वाचे असते.

नात्यांमध्ये विश्वास नसेल तर तिथे आपले बोलणे, वागणे हे वादास्पद होते. 

ज्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो तिथे थोडं जमा होतं. पुढे वेळप्रसंगी ते नातं आपल्यासाठी काहीही करायला तयार  होतं.

म्हणून अशी गुंतवणूक अधूनमधून करत राहिले पाहिजे. बाकी खर्चाचे ज्ञान तर आपल्याला आहेच.