नैराश्याची अशी कोणती लक्षणे आहेत जी सहजासहजी लक्षात येत नाहीत
7 December 2023
Created By : Mahesh Pawar
मनात सतत नकारात्मक विचार येणे. सतत उदासपण जाणवणे.
काहीही करावसे न वाटणे. कशातच मन न रमणे.
रात्री उशिरापर्यंत झोप न येणे किंवा खूप वेळ झोपणे.
नैराश्यामध्ये न्यूनगंडाची भावना अधिक प्रबळ होते.
आपण काहीही करू शकत नाही, आयुष्य जगण्यात काहीच अर्थ नाही असे वाटणे.
भूक मंदावणे किंवा भूक नसतानाही सतत काहीतरी खात रहावेसे वाटणे.
सतत मनात आत्महत्येचे विचार येणे.
आयुष्यात आलेल्या अपयशामुळे किंवा दुःखद घटनेने व्यक्ती नैराश्यात जाते.
अशावेळी संबधित व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते.
मानसोपचार तज्ञांनी सुचवलेल्या उपायांनी ती व्यक्ती लगेच नैराश्यातून बाहेर येईल अशी अपेक्षा ठेवू नये.
त्या व्यक्तीला नैराश्यातुन बाहेर येण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. कारण, काळ हाच रामबाण उपाय आहे.
हे सुद्धा वाचा | घरात नवीन सून आणताना या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.