2 DEC 2025
Created By: Atul Kamble
लिव्हर शरीरासाठी अनेक कामे करते.यामुळे यास शरीराची फॅक्ट्री म्हटले जाते. म्हणून लिव्हरला मजबूत करायला हवे.
लिव्हर शरीरातील विषाक्त पदार्थांना नष्ट करते.पचनासाठी आवश्यक पित्ताचे उत्पादन करते आणि शरीरातील ग्लूकोज संतुलित करते.
जर त्वचा पिवळी दिसत असल तर लिव्हरमध्ये काहीतरी गडबड आहे समजा.यात त्वचा आणि डोळे पिवळसर दिसू लागतात.
पोटात दुखत असेल तर लिव्हर खराब झाल्याची पहिली निशाणी असू शकते. परंतू पोटदुखीला अनेक कारणे जबाबदार असू शकतात.सतत दुखत असेल तर तपासणी करावी
लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात अनेक जागी सूज येते. पाय आणि टाचामध्ये सूज येते. पाय दुखू लागतात.
लिव्हर खराब होताना लघवीचा रंग डार्क होतो. लघवीच्या रंगात जास्त दिवस बदल जाणवत असेल तर गंभीरतेने घ्यावे
लिव्हर खराब झाल्यानंतर खूप थकवा आणि कमजोरी होऊ लागते.जर लवकर बरे होत नसेल तर लिव्हर खराब होण्याचे संकेत असू शकतात.