कर्करोगाच्या सुरुवातीला दिसतात ही  5 लक्षणे, वेळीच सावध व्हा

9 April 2026

कर्करोग शरीरात खूप लहान बदल घडवून आणतो.त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.असे करणे घातक असते.चला कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे पाहूयात

कोणत्याही कारणांशिवाय वारंवार येणारा ताप चिंतेचे कारण असू शकतो.काही प्रकारचे कर्करोग, विशेषत: रक्ताचा कर्करोग - शरीराच्या रोगांशी लढण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. त्यामुळे वारंवार ताप व संसर्ग होतो.

अचानक ५ किलोहून जास्त वजन कमी होणे, हे देखील कर्करोगाचे एक सुरुवातीचे लक्षण असू शकते.स्वादुपिंड, पोटाचा, फप्फुसाचा किंवा अन्ननलिकेचा कर्करोग यात हे लक्षण दिसते.

सामान्यपणे विश्रांती घेतल्यानंतर थकवा दूर होतो. मात्र, पुरेशी विश्रांती घेतली तर वारंवार थकल्यासारखे जाणवत असेल तर चिंतेचे कारण आहे. ल्युकेमिया आणि कोलन कर्करोगात हे लक्षण दिसते.

 त्वचा पिवळी होणे, तिळांच्या आकारात, रंगात अचानक बदल होणे.नवीन तिळ किंवा डाग दिसणे. किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमा हे त्वचेचे कर्करोगाचे किंवा इतर कर्करोगाचे लक्षण असू शकतात.त्वचा पिवळी पडणे हे यकृत वा स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे लक्ष असू शकते.

सततची डोकेदुखी मेंदूच्या ट्युमरचे लक्षण असू शकते. पाठदुखी कोलोरेक्टल वा गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. सतत छातीत दुखणे फुप्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. हाडांचे दुखणे हाडांच्या कर्करोगांचे वा हाडांमध्ये पसरलेल्या इतर कर्करोगांचे लक्षण असू शकते.