25 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
सकाळी पोट रिकामी असताना शरीराची पीएच पातळी असंतुलित असते. आम्लता अधिक सक्रिय असते. अशा स्थितीत काही गोष्टी खाल्ल्याने गॅस, छातीत जळजळ किंवा उलट्या होऊ शकतात.
आहारतज्ज्ञ अनामिक गौर यांच्या मते, लिंबू-संत्र यासारखे लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक एसिड असते. रिकाम्या पोटी घेतल्याने एसिडिटी वाढू शकते.
दही आरोग्यदायी असलं तरी रिकाम्या पोटी खाऊ नये. यात लॅक्टिक एसिड असते. रिकाम्या पोटी घेतल्यास पोट खराब होऊ शकते.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरात मॅग्नेशियमची पातळी अचानक वाढू शकते. यामुले हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकते.
रिकाम्या पोटी मसालेदार आणि तेळकट पदार्थ खाल्ल्याने आतड्यांमध्ये जळजळ आणि गॅस होऊ शकतो. तसेच उलट्याही होऊ शकतात.
बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतात. पण सवय चांगली नाही. यामुळे पोटात आम्लाचे प्रमाण वाढवते.
रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम, कोमट पाणी, ओट्स, काजू, पपई किंवा सफरचंद खाऊ शकता.