Created By: Atul Kamble
8 March 2026
सतत स्क्रीनवर काम केल्याने आणि पोषणाच्या कमतरतेने डोळ्यांचे आरोग्य बिघडत आहे.
विटामिन ए, ई आणि जेक्सैंथिन, ल्युटीन सारखे पोषक तत्वे असणारे पदार्थ खाल्ले तर डोळ्याचे आरोग्य चांगले रहाते.
मासे खाणे डोळ्यांसाठी चांगले असते. यात ओमेगा-३ सह विटामिन ए आणि ई देखील असते. तसेच अनेक मिनरल्स देखील असतात
अंड्यात विटामिन ए तसेच ओमेगा-३ , ल्युटिन, जेक्सैंथिन सारखे पोषक घटक असतात. जे रेटिनला ब्ल्यू लाईटपासून वाचवतात.
गाजरात बिटा कॅरोटीन भरपूर असते. त्यामुळे गाजराचे सेवन डोळ्यांसाठी फायद्याचे असते.
पपई देखील डोळ्यांसाठी चांगले फळ आहे. यात विटामिन ई असते. कॅरोटीनॉईड देखील असते. त्वचा आणि पचनासाठी हे फळ चांगले असते.
नट्समध्ये बदामात ओमेगा-३ फॅटी एसिड सोबत विटामिन ए भरपूर असते. बदाम ऑक्सीडेटिव्ह डॅमेजपासून डोळ्यांना वाचवतो. वय वाढल्याने होणाऱ्या डोळ्यांच्या समस्येत बदाम फायद्याचे असते.