केसांच्या भरघोस वाढीसाठी हे ज्यूस येतील कामी, पाहा कोणते ?

29 ऑगस्ट 2026

Created By:  atul kamble

चांगले निरोगी केस असणे हे आजच्या प्रदुषण आणि खराब जीवनशैलीत दुर्मिळच झाले आहे.

अनेक रासायिक शॅम्पूने केस चांगले होण्याऐवजी ते रुक्ष आणि निर्जीव होतात.

आपण काही नैसर्गिक ज्यूसच्या मदतीने केसांचे आतून पोषण कसे होते ते पाहाणार आहोत.

गाजर - केसांच्या  वाढीसाठी उपयुक्त अशा 'व्हिटॅमिन A' आणि 'बीटा-कॅरोटीन'ने गाजर समृद्ध असते.

आले - आल्याचा ज्यूस स्कॅल्पचे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना चालना देते.

संत्रे - संत्र्यात 'व्हिटॅमिन सी'चे प्रमाण भरपूर असते. कोलेजन वाढवण्यास आणि केस मजबूत करण्यास संत्रे मदत करते.

नारळ पाणी - नारळपाणी स्कॅल्पला खोलवर हायड्रेट करते आणि चमकदार आणि निरोगी केसांसाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवते.