24 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
डायबिटीज नियंत्रित करताना अनेक पथ्ये पाळावीच लागतात. शुगर कंट्रोल करणे सर्वात महत्वाचे असते.
डायबिटीजला नियंत्रित करताना आपण अनेक चुका करत असतो. त्या चूका कोणत्या ते पाहूयात.
जर तुम्हाला डायबिटीज आहे तर फास्ट फूड अजिबात खाऊ नका. जास्त कार्बोहायड्रेट फूड्स, स्वीट ड्रींक्स आणि फास्ट फूड्स आदींचे सेवन टाळावे
एकाच जागी जास्त वेळ बसणे टाळावे. कारण असे केल्याने शुगर लेव्हल एकदम वेगाने वाढते.
बाजारातील जाहिरातींना भुलून स्वत:हून कोणतीही औषधे घेऊ नका, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळनुसार खा
तणाव कमी करुन काम करा, ताण-तणावाने कोर्टिसोल सारखे हार्मोन्स रिलीज होतात. जे लिव्हरला ग्लुकोज सोडण्याचे संकेत देतात. त्यामुळे डायबिटीज आऊट ऑफ कंट्रोल होऊ शकतो.
भरपूर झोप घ्या. किमान ७ ते ८ तास झोप पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे इंन्सुलिन रेजिस्टन्स वाढते. आणि भूक वाढवणारे हार्मोन्स असंतुलित होतात.
भरपूर ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करा, त्यामुळे डायबिटीज कंट्रोल करण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या )