या लोकांनी चुकूनही फ्रिजचे पाणी पिऊ नये?

4 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

उन्हाळ्यात काहीतरी सतत थंड खावं किंवा प्यावसं वाटत असतं

त्यामुळे सगळे शक्यतो उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरमधलं थंड पाणी पितात. पण काही लोकांनी चुकूनही फ्रिजचे पाणी पिऊ नये

गर्भवती महिलांनी फ्रिजचे पाणी पिऊ नये. शरीराचे तापमान अचानक बदलू शकते आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात

ज्या लोकांना श्वासनाचा त्रास आहे, दमा आहे त्यांनीही फ्रिजचे पाणी पिऊ नये.यामुळे त्यांच्या श्वसनाच्या समस्या वाढवू शकतात

पचन समस्या, आम्लपित्त अशा समस्या असतील त्यांनी फ्रिजचे पाणी पिऊ नये कारण ते पचन प्रक्रिया मंदावू शकते.

हृदयरोग, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये, थंड पाणी पिण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात. हृदयावर दबाव वाढू शकतो.