कमजोर हाडांना मजबूत बनवण्यासाठी हे उपाय कामी येतील
12 April 2026
खराब जीवनशैली आणि चुकीचा आहारामुळे हाडे वेळेआधीच कमजोर होतात.यासाठी काही इफेक्टीव्ह पदार्थ खाल्ले जातात. ज्यांचे काही साईड इफेक्टही असतात.
आज आपण काही उपाय पाहणार आहोत.ज्याने हाडे मुळापासून मजबूत होऊ शकतात.चला तर या उपायांबाबत सविस्तर माहिती घेऊयात...
हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमने भरपूर असलेले पदार्थ खावेत. दूध, पनीर आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा
हे कॅल्शियम जादा असलेले पदार्थ मर्यादेत खावेत, कारण यांना जास्त खाल्ल्यास याचे साईड इफेक्ट देखील होत असतात.
आहारात टुना, मॅकेरल, अंड्याचे बलक, मशरुम आणि फोर्टिफाईड दूध आदींचा समावेश करावा. त्यामुळे हाडे दीर्घकाळ मजबूत राहू शकतात. कारण यात व्हिटामिन-डी आढळते.
व्हिटामिन- डी असलेले हे पदार्थ सेवन करताना एक काळजी घ्यावी की हे पदार्थ मर्यादेतच खावेत. यांचे अधिक प्रमाणात सेवन आरोग्य बिघडवू शकते
तुम्ही डेली रुटीनमध्ये वॉकिंग, जॉगिंग, डान्सिंग, वेट ट्रेनिंग, ताडासन, वृक्षासन आणि भुजंगासन आदी फिजिकल एक्टीव्हीटी करायला हव्यात, याने हाडांची कमजोरी दूर होते.
येथे दिलेले उपाय केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहेत.अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या