7 DEC 2025
जर रात्री गाढ झोप झाली तर अनेक आजार आपल्यापासून दूर रहातात. दिवसभर चिडचिड होत नाही.
चांगली झोप येण्यासाठी मॅग्नेशियम असलेले पदार्थ खावेत.उदा. पालक, बदाम, सीड्स, मिलेट्स, चणे आणि मासे खावेत
ट्रीप्टोफॅन असलेले पदार्थ खावे.दही,पनीर,ओट्स, अंडी, केळी आणि शेंगदाण्यात ट्रीप्टोफॅन असते. त्यामुळे झोप चांगली येते
दुपारनंतर चहा-कॉफीचे सेवन बंद करावे. यात कॅफीन अलर्टनेस वाढवतो.त्यामुळे रात्री नीट झोप येत नाही.
रात्री लवकर जेवण करावे.जास्त जेवल्याने शरीराचे तापमान वाढते. पचन शक्तीत गडबड होते त्यामुळे झोप नीट येत नाही.
सायंकाळी एक कप गरम हर्बल चहा पिल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.