बद्धकोष्ठतेसाठी हे घरगुती उपाय करुन पाहा

21st July 2025

Created By: Aarti Borade

बद्धकोष्ठतेसाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात

त्रिफळा चूर्ण रात्री कोमट पाण्यासोबत घेतल्यास आतड्यांची हालचाल सुधारते 

इसबगोल पाण्यात मिसळून घेतल्याने मल नरम होते आणि आतड्यांना आराम मिळतो

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते

जिरे पाणी किंवा जिरे चूर्ण सेवन केल्याने बद्धकोष्ठता कमी होऊ शकते

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे फायदेशीर असते