उन्हाळ्यात पचन यंत्रणा चांगली राखण्यासाठी हे उपाय आजमावा
Created By: Atul Kamble
उन्हाळ्यात डायजेशनची विशेष काळजी घ्यावी, उष्णतेमुळे पोटात गडबड आणि ब्लोटिंग होऊ शकते.
उन्हाळ्यात हलका आहार घ्यावा. त्यामुळे पचन सहज होईल. तसेच एसिडीटी, ब्लोटिंगपासून बचावासाठी काही उपाय लक्षात घ्यावेत.
जेवणानंतर बडीशेप चावून खावी. त्यामुळे जेवण पचते आणि शरीराला आतून थंड देखील वाटते.यात अनेक व्हिटामिन आणि मिनरल्स असतात.
जेवल्यानंतर काही वेळ फेरफटका मारा. किमान १० मिनिटे चाला. यामुळे जेवण पचन होईल आणि हलके देखील वाटेल.
जर तुमच्याकडे चालण्यासाठी वेळ नाही तर बसल्या जागी वज्रासन पोझमध्ये तुम्ही काही मिनिटे बसू शकता.
जेवल्यानंतर काही वेळाने तुम्ही हर्बल चहा घेऊ शकता. यामुळे जडपणा,पोटातील दुखणे, एसिडीटी कमी होते. आल्याचे पाणी लिंबू टाकून पिऊ शकता. मिंटचा चहा पिऊ शकता.
जेवल्यानंतर लागलीत बिछान्यावर आडवे पडू नका.डीनर नंतर बहुतेक लोक लगेच आडवे पडतात. त्यामुळे एसिडीटी, पोटात गॅस, जडपणा येऊ शकतो.