जेवणातील लसणाचा तिखट वास दूर करण्यासाठी वापरा या टिप्स

10 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

अनेकदा भाजीत लसणाचा कच्चा वास राहतो, ज्यामुळे चव खराब होते.

लसूण दुधात भिजवल्याने त्याचा कच्चा वास निघून जातो. लसूण 10-15 मिनिटे दुधात भिजवा. लसणातील सल्फर कंपाऊंड कमी होतं

भाजीत घालण्याआधी लसूण कुस्करून 5 ते 10 मिनिटे तसेच ठेवा. असे केल्याने त्याचा तिखट वास कमी होतो.

लसणाचा तिखट वास कमी करण्यासाठी त्याचे लहान तुकडे करा आणि त्यावर लिंबाचा रस घाला

लसणाच्या पाकळ्या काहीवेळ व्हिनेगरमध्ये बुडवून नंतर ते वापरा

लसणावर मीठ शिंपडल्याने त्याचा तिखट वास निघून जातो. लसूण चिरून घ्या आणि नंतर तो कुस्करून त्यावर मीठ शिंपडा