तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल वापरता ? वेळीच थांबा नाहीतर...
13 September 2024
Created By : Manasi Mande
मोबाईल किंवा स्मार्टफोन हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. मनोरंजनासाठी याचा वापर करत असलो तरी अनेक जण मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जातात.
आजकाल बहुतांश लोक टॉयलेटमध्ये फोन वापरतात. पण यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो.
फोनच्या खूप आहारी गेल्याचं हे लक्षण आहे. त्यामुळेच टॉयलेटमध्ये गेल्यावरही फोन सोडवत नाही.
फोनचा अतिवापर हा व्यसनासारखा असतो आणि काही दिवसांतच त्या शिवाय जगणं कठीण होतं.
तसेच टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने जास्त वेळ लागतो आणि तुमच्या रेक्टल व्हेन्सवर अती ताण पडतो.
यामुळे अनेकांना Hemorrhoids ची समस्या जाणवू शकते. त्यामुळे तुम्हाला खाली बसताना त्रास , वेदना होऊ शकतात.
टॉयलेटमध्ये अनेक जंतूही असतात, जे फोनला चिकटतात. बाहेर आल्यावर आपण हात तर धुतो, पण तसाच फोनही साफ करतो का ?
संपूर्ण दिवस तो फोन तसाच वापरल्याने ते जंतू तुमच्या शरीरापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही आजारी पडू शकता.
चांगली तब्येत हवी असेल तर टॉयलेटमध्ये फोन वापरणं बंद केलं पाहिजे.
सुनेला सासू-सासऱ्यांसोबत राहायचं का नसतं ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा