वाढत्या वयाबरोबर शरीरात अनेक बदल होत असतात. वय लपवण्यासाठी अनेक जण महाग प्रॉडक्ट खरेदी करतात.
13 June 2025
वाढत्या वयात तुम्हाला तरुण दिसावे, असे वाटत असेल तर महाग क्रिमची गरज नाही. त्यासाठी थोडे ऊन आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे.
हार्वर्ड विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार, व्हिटॅमिन डी वाढत्या वयाचा वेग कमी करु शकतो. तुम्हाला आतून तरुण ठेवण्यासाठी मदत करतो.
संशोधनात एक हजारापेक्षा जास्त ज्येष्ठ लोकांचा समावेश केला. त्यातून असे स्पष्ट झाले की, ज्यांच्या शरीरात मुबलक व्हिटॅमिन डी आहे, त्यांचा वृद्ध होण्याचा वेग कमी आहे.
शास्त्रज्ञांनी 'एपिजेनेटिक क्लॉक' नावाच्या एका तंत्रज्ञानाचा वापर केला. ते तंत्रज्ञान डिएनएमध्ये होणारे बदल दाखवते. त्यातून वृद्धत्वाकडे जाण्याचा वेग कळतो.
संशोधनात दिसले ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात आहे, त्यांचे शरीर सदृढ आणि युवा आहे.
व्हिटॅमिन डी तुमची हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी महत्वाचे आहे. शरीरातील रोगप्रतिकार क्षमता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन डी साठी रोज 15-30 मिनिटे कोवळे ऊन अंगावर घ्या. तसेच मासे, अंडे, दूध, मशरूम यांचा समावेश आहारात करा.
व्हिटॅमिन डी साठी रोज 15-30 मिनिटे कोवळे ऊन अंगावर घ्या. तसेच मासे, अंडे, दूध, मशरूम यांचा समावेश आहारात करा.