केमिकलयुक्त आंबे खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?

25  मे 2025

Created By:  संजय पाटील

सध्या आंब्याचा सिजन सुरु आहे. आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आणि नफा मिळण्यासाठी आंबे केमिकलने पिकवले जातात.

नैसर्गिक पद्धतीने पिकवेलेले आंबे चवीला गोड आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र आंबे झटपट पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो.

कॅल्शियम कार्बाईडमुळे  उष्णता निर्माण होते ज्यामुळे फळ लवकर पिकतं. या केमिकलमध्ये ईथाईल नावाचं गॅस तयार होतो, जो आरोग्यासाठी हानीकारक असतो.

कॅल्शियम कार्बाईडचा वापर करुन पिकवण्यात आलेले आंबे खाल्याने त्याचा लिवर आणि किडनीवर वाईट परिणाम होतो. अनेक समस्या उद्भवू शकतात.

असे आंबे खाल्ल्याने डिहायड्रेशनमुळे वारंवार तहान लागणं, अशक्तपणा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात

तसेच श्वसनाचे आजार होऊ शकतात. श्वास घ्यायला त्रास, खोकळा या आणि अशा समस्या उद्भवू शकतात

कॅल्शियम कार्बाईडचं सातत्याने अप्रत्यक्षपणे फळांद्वारे सेवन होत राहिल्यास कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या