लठ्ठपणामुळे होणारे 10 गंभीर
आजार कोणते ?
Created By: Atul Kamble
26 December 2025
लठ्ठपणा हा स्वत: काही आजार नाही, परंतू लठ्ठपणा शरीरात होणाऱ्या अनेक गंभीर आजारांचे कारण ठरतो.
मधुमेह - शरीरातील इन्सुलिनचा परिणाम कमी होतो. लठ्ठपणा या आजाराचे सर्वात मोठे कारण आहे.
हृदयरोग - अधिक चरबीमुळे ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे हृदया झटका आणि स्ट्रोकचा धोका अनेक पटीने वाढतो.
उच्च रक्तदाब - लठ्ठ लोकांत हृदयाला पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढते.
फॅटी लिव्हर रोग - पोटाची चरबी वाढल्याने लिव्हरमध्ये फॅट जमा होते. हा नॉन - अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डीसीज ( NAFLD ) म्हटला जातो.
संधीवात - शरीराचे अधिक वजन सांध्यावर ( खास करुन गुडघे आणि पाठ )पडते, ज्यामुळे वेदना आणि सूज वाढते.
स्लीप एपनिया - यात गळ्याजवळ चरबी वाढल्याने झोपेत श्वास थांबण्याची समस्या निर्माण होते.
कॅन्सर - लठ्ठपणामुळे स्तन, गर्भाशय, मोठे आतडे, किडनी आणि लिव्हर कॅन्सरचा धोका वाढतो.
किडनी रोग - लठ्ठपणामुळे ब्लड प्रेशर आणि डायबिटीज दोन्ही वाढते,ज्यामुळे किडनीला धोका निर्माण होतो.
हार्मोनल असंतुलन - खास करुन महिलांमध्ये लठ्ठपणामुळे पीसीओडी/पीसीओएस सारख्या समस्या निर्माण होतात.
डिप्रेशन आणि मानसिक तणाव - शरीराची बनावट आणि आत्मविश्वासावर परिणाम झाल्याने मानसिक तणाव आणि नैराश्य येऊ शकते.
थंडीत डीहायड्रेशनची लक्षणे काय ?