थंडीत डीहायड्रेशनची लक्षणे काय ?
Created By: Atul Kamble
25 December 2025
थंडीत तहान कमी लागल्याने लोक पाणी कमी पितात. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होत जाते. ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
पाणी कमी पिल्याने थकवा यतो. चक्कर येऊ शकते. पचनाच्या समस्या सुरु होतात. त्यामुळे दुर्लक्ष करु नये
डीहायड्रेशनमध्ये शरीराला एनर्जी मिळत नाही. त्यामुळे जास्त काम न करताही थकवा येतो आणि सुस्ती वाढते असे डॉ. सुभाष गिरी म्हणतात.
शरीरात पाणी कमी झाल्याने मेंदूत ऑक्सीजन आणि पोषक तत्वे नीट पोहचत नाही.त्यामुळे डोकेदुखी आणि चक्करची समस्या येऊ शकते.
लघवीचा रंग डार्क पिवळा झाला तर समजावे की शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच लघवीला देखील कमी येते.
त्वचेचा ओलसर पणा कमी होतो. त्वचा रुक्ष होत. त्यामुळे त्वचा निर्जीव होते.
डीहायड्रेशनचा परिणाम पचन तंत्रावर होतो. पाण्याच्या कमतरतेने बद्धकोष्ठता, गॅस, पोटात जडपणा असे त्रास होतात.
थंडीत गुडघे दुखी कशी कमी करावी ? पाहा काय उपाय