मूग स्प्राउट्स (अंकुरित मूग डाळ) खाण्याचे अनेक फायदे आहेत. मूग स्प्राउट्स एक सुपरफूड आहे. 

24 May 2025

Created By : जितेंद्र झंवर

मूग डाळीत फायबर, पॉटेशिययम, बी6 आणि आयरन असते. त्यामुळे पचन संस्था चांगली होते. ब्लड शुगर कंट्रोल होते.

मूग भिजवून सेवन करणे अधिक फायदेशीर आहे. हे स्प्राउट्स कोणत्या वेळेत खावे, यासंदर्भात अनेकांचा संभ्रम असतो. 

मूग स्प्राउट्स खाण्याची योग्य वेळ सकाळची असते. रिकाम्या पोटी त्याचे सेवन करणे चांगले आहे. त्यामुळे दिवसभर उर्जा मिळते. 

मूगातील काही पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची शक्ती शरीराला मिळते.

मूग स्प्राउट्स पोटासाठी वरदान आहे. त्यात फायबर असल्यामुळे पचन संस्था चांगली राहते. तसेच गॅस, अॅसिडीटी याची समस्या होत नाही. 

मूगामध्ये सायट्रोजन हे घटक असतात. त्यामुळे शरीरातील कोलेजन आणि एलास्टिन कायम राहत. त्याने चेहराही चमकदार बनतो.