जवस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे जेवणानंतर बडीशेपसारखी जवस खाल्ली जाते.

18 February 2025

जवसमध्ये प्रोटीन, मॅग्नीशियम, फॉस्फोरस, कॉपर, फायबर, ओमेगा-3 फॅटी एसिड आणि एंटीऑक्सीडेंट आहेत.

जवस रात्री भिजवून सकाळी खाल्यानंतर त्याचे खूप फायदे आहेत.

भिजवलेली जवसमध्ये फायबर मुबलक असते. त्यामुळे पाचनतंत्र चांगले होते. त्यामुळे गॅसची समस्या सुटते.

जवसमध्ये फायबर आणि हेल्दी फॅट असतात. त्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले वाटते. वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरते. 

जवसमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी एसिड आणि एंटीऑक्सीडेंट कोलेट्रॉल कमी करते. त्यामुळे ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते. 

डायबिटीज रुग्णांसाठी जवस फायदेशीर आहे. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. 

एक, दोन चमचे जवस रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावी. दह्यासोबत जवस खावू शकतात.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.