नवरा घरी नसतो तेव्हा बायको काय करते? 

16 November 2023

Created By: Mahesh Pawar

नवरा घरी नसताना बायको अश्या अनेक गोष्टी करते ज्या ती नवऱ्याला कधीच सांगत नाही.

स्वयंपाक करताना ती आपल्या नवऱ्याच्या आवडीचे जेवण बनविण्याचा विचार करत असते.

जेवणाव्यतिरिक्त लाडू, लोणची, पापड, चकल्या, चटण्या देखील तो घरी नसताना बनवल्या जातात.

नवरा घरी नसतो तेव्हा बायको मुलं, सासू, सासरे, नणंद, भावजय, दीर यांच्या आवडीनिवडीदेखील जपत असते.

आरश्यासमोर ती चुकून थबकलीच तर न्याहाळायचं विसरून आधी त्याचे डाग पुसायला धावते.

नवऱ्याला घरी यायला थोडा उशीर झाला तर कासावीस होऊन काळजीने फोन करते.

नात्यातली लहान मुलं घरी राहायला आली तर त्यांची आपल्या मुलांसारखी काळजी घेते.

घरात इलेक्ट्रीक, प्लम्बिंगची काम नवरा घरी नसतो तेव्हा त्याच्या सूचनेप्रमाणे करून घेते.

तिच्या मनात सुखी संसाराविषयी येणाऱ्या अनेक गोष्टी नवऱ्याला कशा सांगू याची तालिम करत असते.

नवरा घरी नसताना त्याच्या कुटुंबाचा सन्मान आणि अभिमानाला कुठलीही ठेच पोहोचणार नाही याची काळजी घेते.

त्यामुळे नवरा घरी नसताना बायको काय करते, याबाबत नव-यांनी निश्चिंत राहायला हरकत नाही.