Kissing Disease म्हणजे नक्की काय ? फक्त Kiss केल्यामुळे पसरू शकतात का आजार?

18 November 2023

Created By: Mahesh Pawar

सध्या एक विचित्र आजार वेगाने सगळीकडे पसरत आहे. याचं नाव आहे किसिंग डिसीज (Kissing Disease)

हा आजार संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस (मोनो) नावाने ओळखला जातो.

लाळेद्वारे पसरणारा एपस्टाईन-बॅर विषाणू या आजारामागचं मुख्य कारण आहे. 

चुंबनामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे या आजाराचं नाव किसिंग डिसीज असं ठेवण्यात आलंय. 

थकवा, घसा खवखवणे, ताप, मान आणि काखेत सुज, सुजलेले टॉन्सिल्स, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ ही याची लक्षणे आहेत. 

मोनो असलेल्या व्यक्तीचा ग्लास किंवा जेवणाची भांडी शेअर केल्यास तुम्हाला याचा संसर्ग होऊ शकतो.

सामान्य सर्दीसारखा मोनोन्यूक्लिओसिस संसर्गजन्य नाही असे सांगितलं जातं.

या आजाराची लक्षणं दिसल्यास किंवा आजार असल्यास शारीरिक संबंध ठेवणं टाळायला हवं.