इम्युनिटी वाढवण्यास कोणते पदार्थ मदत करतात ?

Created By: Atul Kamble

7 March 2026

मजबूत इम्युनिटी शरीराला व्हायरस, बॅक्टेरियांपासून वाचवते अनेक आजारांपासून लढण्याची ताकद देतात. संतुलित आणि पोषक तत्व असलेले फूड्स खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 संत्री,लिंबू आणि मोसंबी सारखी लिंबूवर्गीय फळांच्या सेवनाने इम्युनिटी मजबूत होते. शरीराला आजारी पडण्यापासून वाचवता येते.

 पालक, मेथी, चवळी सारख्या पाले भाज्यांमुळे विटामिन, आयर्न आणि एंटीऑक्सिडेंट भरपूर मिळते. त्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने इम्युन सिस्टीम चांगला होते.

लसूणमध्ये एंटी बॅक्टेरियल आणि एंटी व्हायरल गुण असतात. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 दह्यात प्रोबायोटिक्स असतात ते पोटाची आरोग्य चांगले राखतात. पचन यंत्रणा चांगली झाल्याने इम्युनिटी वाढते शरीराला अनेक आजारांपासून वाचवते.

आल्यात एंटीऑक्सिडेंट  आणि एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात.याचे सेवन केल्याने शरीरातील सूज कमी होते.इम्युन सिस्टीम देखील मजबूत होते.

 बदाम आणि नट्समध्ये विटामिन ई आणि हेल्दी फॅट्स असते. यांना मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने पोषण मिळते. इम्युनिटी चांगली रहाते.