अनेक आजारांपैकी युरिक अ‍ॅसिड हा देखील एक आजार अनेकांना होऊ लागला आहे.

7 June 2025

युरिक अ‍ॅसिड केमिकल पदार्थ आहे. प्यूरिनपासून त्याची निर्मिती होते. खाण्या-पिण्याच्या वस्तूतून प्यूरिन मिळते. 

प्यूरिन पदार्थांचे फूड खाल्यावर शरीरात जास्त प्यूरिन निर्माण होते. किडनी ते योग्य पद्धतीने बाहेर काढू शकत नाही. त्यावेळी रक्तात युरिक अ‍ॅसिड वाढते. 

डॉ. दीपक सुमन म्हणतात, युरिक अ‍ॅसिड वाढल्यास, सांधेदुखी, सूज, आणि मूतखडे होण्याची शक्यता असते.

युरिक अ‍ॅसिडमुळे सांध्यामध्ये क्रिस्टल्स जमा होऊ लागतात. त्यामुळे तीव्र वेदना आणि जळजळ होते. ही समस्या विशेषतः अंगठे, गुडघे यामध्ये जास्त जाणवते.

युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे वारंवार लघवी होणे, लघवीमध्ये फेस येणे आणि लघवी करताना जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

बिअर आणि वाईन लिव्हर आणि किडनीसाठी घातक आहे. तसेच शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी देखील वाढवते.