दररोज वेलचीचं पाणी प्यायलं तर काय होतं ? 

26 March 2025

Created By : Manasi Mande

वेलची सुगंधित मसाल्याच्या पदार्थांपैकी एक. गोड पदार्थांमध्ये त्याचा विशेष वापर होतो. काही लोकं वेलचीचा माऊथ फ्रेशनर म्हणून वापर करतात.

पण रोज सकाळी वेलचीचं पाणी प्यायल्यास तब्येतीवर काय परिणाम होतो, हे तुम्हाला माहीत आहे का  ? एक्स्पर्टकडून जाणून घ्या.

आयुर्वेदिक एक्स्पर्ट डॉ. डिंपल जांगडा सांगतात की, 5-6 वेलचीचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी दिवसातून एकदा प्या.

वेलचीमध्ये मॅग्नेशिअम, कॅल्शिअम असतं ते आरोग्यासाठी चांगलं असतं. ते पाणी प्यायल्याने फॅट वेगाने कमी होतं.

तुम्हाला पचनाशी संबधित समस्या असेल तर रोज सकाळी अंशपोटी वेलचीचे पाणी प्या, त्याने बद्धकोष्ठता होत नाही.

वेलचीत अँटी-ऑक्सीडेंट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. वेलचीचं पाणी प्यायल्याने रक्तदाब वाढत नाही.

वेलचीत अँटी-ऑक्सीडेंट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. वेलचीचं पाणी प्यायल्याने रक्तदाब वाढत नाही.