रोहित शर्माची पत्नी करते काय ? रितीकाचेही खेळाशी खास कनेक्शन

12 March 2025

Created By : Manasi Mande

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या विजयानंतर देशभरासह सोशल मीडियावरही जल्लोष सुरू आहे. अनेक खेळाडूंचे मोमेंट्स, कुटुंबासोबतचे क्षण याचे व्हिडीओ व्हायरल झाले.

त्यामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हिची.

शेवटच्या मॅचमध्ये रोहित 76 धावांवर बाद झाला तेव्हा रितीकाची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आणि व्हायरलही.

पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर रितीकाने रोहित आणि इतर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.  ती नेमकं काय काम करते याची अनेकांना उत्सुकता आहे.

रिपोर्टनुसार, रोहितची पत्नी रितीका ही स्पोर्ट्स मॅनेजर आहे.  आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यात तिची महत्वाची भूमिका आहे.

ती कोट्यवधींच्या डील्स सांभाळते . रितीकाने तिच्या कझिनसह  CornerStone मधून करिअरला सुरूवात केली.

तिने विराट कोहलीसाठी Tissot, Audi, Pepsi , Adidas यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी डील करण्यास मदत केली.

2020 साली CornerStone ने Dhama Production सह मिळून Dharma Cornerstone Agency (DCA) बनवली.

ही एजन्सी जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे , विजय देवरकोंडा या सेलिब्रिटींना मॅनेज करते.