Anushka Sharma : अनुष्का शर्माची रोहितला जादू की झप्पी !
10 March 2025
Created By : Manasi Mande
अंतिम सामन्यात न्युझीलंडला 4 विकेट्सनी हरवत टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर नाव कोरलं.
या खास मॅचला विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही स्टेडियममध्ये उपस्थित होती.
टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय खेळाडूंचे कुटुंबीयही सेलिब्रेशनदरम्यान मैदानात दिसले, तेव्हाही अनुष्का हजर होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील ऐतिहासिक विजयानंतर अनुष्काने विराटला मिठी मारली.
हे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
त्यानंतर अनुष्काने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही जादू की झप्पी देऊन विजयाबद्दल अभिनंदन केलं. त्यावेळी रितीकाही मैदानात उपस्थित होती.
रोहितनंतरअनुष्काने हार्दिक पंड्यालाही मिठी मारली, विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या या कृतीचं खूप कौतुक होतंय.
प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का मैदानावर उपस्थित असते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्वाच्या सामन्यांसाठीही ती आली होती.
असे घेतले हातात हात… सारा तेंडुलकरचे फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा