14 फेब्रुवारी 2025

लसूण आणि कांदा एकत्र खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या

लसूणामुळे जेवणाला चव येते. त्यामुळे स्वंयपाक लसणाचा वापर भाज्या, डाळी आणि अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. 

कांदाही स्वंयपाकघरातील आवश्यक भाग आहे. यामुळे अन्नाची चव वाढते. तसेच रोगप्रतिकार शक्तीही वाढते. 

आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे म्हणतात की, कांदा आणि लसूण यांच्या अनेक पोषक घटक आहेत. एकत्र खाल्ल्याने आरोग्यदायी फायदे होतात. 

लसूण आणि कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. 

कांदा आणि लसूण वृद्धत्वविरोधी आहे. याच्या सेवनाने सुरकुत्या, काळे डाग आणि वृद्धत्वाच्या लक्षणांना प्रतिबंध येतो. 

वजन नियंत्रणात ठेवण्यातही कांदा आणि लसूण फायदेशीर ठरतो.

लसूण खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची समस्या कमी होते, असं आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

कच्चं कोरफड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?