पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?

14 सप्टेंबर 2026

पेर या फळाची तुलना नेहमी सफरचंदाशी होते.हिवाळ्यात आणि पावसात ही फळे येतात. एका पेरमध्ये किती व्हिटामिन्स आणि मिनरल आहेत हे वाचू यात.

यूएसडीएने दिलेल्या डेटानुसार मध्यम आकाराच्या सुमारे १७८ ग्रॅमच्या पेरमध्ये १६ mg कॅल्शियम, ०.३२ mg आयर्न, १२.५ mg मॅग्नेशीयम, २१,४ mg फॉस्फोरस, २०५ mg पोटॅशियम आढळते.

एका पेरमध्ये ७.६५ mg व्हिटामिन सी असते. तसेच त्यात, १२.५ mg फोलेट, १.७८ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन ए आणि ७.८३ मायक्रोग्रॅम व्हिटामिन के असते. त्यात अनेक बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे देखील असतात.

पेरमध्ये ५.५२ ग्रॅम टोटल डायटरी फायबर असते. आणि ०.६४१ ग्रॅम प्लांट बेस्ड प्रोटीन असते. यात १०१ kcal एनर्जी मिळते.

पेरमध्ये कॅरोटीन बिटा व्हिटामिन्स ए चे एक रुप, कोलाईन, ल्युटी, जेक्सेंथिन सह काही प्रमाणात फॅटी एसिट देखील आढळते.

पचनासाठी पेर चागंले असते. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्यांनी पेर चावून खावे.